
पिंपरी : ‘‘राजीव गांधी आयटी पार्क व परिसरात असणारा पायाभूत सुविधांचा अभाव, येथे होणारी वाहतूक कोंडी, विस्कळीत वीजपुरवठा यातून मार्ग काढण्यासाठी हिंजवडीसह जांभे, गहुंजे, नांदे, लवळे, पिरंगुट, भुकूम या भागांसाठी स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करावी. जोपर्यंत हा निर्णय होत नाही; तो पर्यंत येथे नोडल अधिकारी नेमावा,’’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.