
पुणे : हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान पार्क (आयटी पार्क) आणि परिसरातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी तेथील कंपन्या, नागरिक संघासह सर्व यंत्रणांच्या प्रतिनिधींचा व्हॉट्सॲपवर प्लॅटफॉर्म (व्यासपीठ) तयार करावा. त्यावर कंपन्यांकडून जे प्रश्न, समस्या मांडण्यात येतील, ते तातडीने सोडविण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, विभागीय आयुक्त स्तरावर दर १५ दिवसांनी कामांचा आढावा घेण्याचेही ठरले.