
पुणे : ‘‘हिंजवडीत पूरस्थिती पुन्हा ओढवणार नाही. मागील रविवारी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यावेळी दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू झाले आहे. अनधिकृत बांधकामे हटविली जात आहेत. हिंजवडीत किती पाऊस पडतो, किती पाणी येते, कोणते ओढे बुजविले आहेत, याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. ओढ्यांवर बांधलेल्या इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. लक्ष्मी चौक ते उड्डाणपूल, घोटवडे-माण-हिंजवडी-मारुंजी-कासारसाई, पाषाण-सूस-पिरंगुट, म्हाळुंगे-घोटवडे या रस्त्यांची कामे करण्याची सूचना दिली आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.