
Hinjawadi Protest
Sakal
हिंजवडी : हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील खराब रस्ते, पोलिसांचे दुर्लक्ष आणि अवजड वाहनांच्या रहदारीमुळे अपघातांचे सत्र चालूच आहे. त्याच्या निषेधार्थ रहिवासी, आयटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी (ता.११) दहा वाजता शांततामय मार्गाने निदर्शने केली. राज्य सरकार आणि संबंधित शासकीय यंत्रणांबद्दल रोष व्यक्त करुन ‘विकास हवा, मृत्यू नको!, निष्पाप बळींना जबाबदार कोण ? अशा आशयांचे फलक झळकाविले.