Hinjewadi Metro Delayed Again : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला तिसऱ्यांदा मुदतवाढ; पुढील वर्षी मार्चमध्ये प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता
Pune Metro Gets Third Extension : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता मार्च २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
पुणे : हिंजवडी - शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या पूर्णत्त्वास आता पुढील वर्षाचा मार्च महिन्याचा मुहूर्त मिळाला आहे. या मेट्रो प्रकल्पाला तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. सध्या या प्रकल्पाचे काम सुमारे ८४ टक्के पूर्ण झाले आहे.