
हिंजवडी फेज वनमध्ये आज सकाळी भीषण अपघात घडला. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. या दुर्घटनेत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.