दिनविशेष ता. २८ ऑगस्ट

दिनविशेष ता. २८ ऑगस्ट
Published on

दिनविशेष ता. २८ ऑगस्ट

१९९४ ः बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील डॉ. गीता सेन यांना ‘व्होल्वो पर्यावरण पुरस्कार’ जाहीर.
२००४ ः अर्जेंटिनाने फुटबॉल विजेतेपद जिंकून ऑलिंपिकमध्ये ५२ वर्षांच्या दीर्घावधीनंतर सुवर्णपदक मिळविले. अर्जेंटिना हा ऑलिंपिक सुवर्ण मिळविणारा पहिला लॅटिन अमेरिकी देश ठरला आहे.
२०१४ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जन धन योजने’चे उद्‌घाटन. एकाच दिवसांत तब्बल दीड कोटी बॅंक खाती उघडण्यात आली. अशाप्रकारे झालेला हा जगभरातील सर्वांत मोठा प्रयोग आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com