दिनविशेष ता. २९ ऑगस्ट

दिनविशेष ता. २९ ऑगस्ट
Published on

दिनविशेष ता. २९ ऑगस्ट

२००४ ः जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या ‘अग्नी’ या क्षेपणास्त्राची चाचणी बालासोर येथील व्हिलर बेटावर यशस्वी झाली. यामुळे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इस्राईल व ब्रिटनच्या पंगतीत भारत दाखल झाला आहे.
२००७ ः भारतीय फुटबॉल संघाने अंतिम सामन्यात सीरियाचा १-० असा पराभव करून प्रथमच नेहरू करंडक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्‍यपद पटकावले.
२००७ ः जागतिक ‘ट्रॅप शूटिंग’ स्पर्धेमध्ये विजेता ठरलेल्या मानवजितसिंग संधू याला ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार प्रदान.
२०१५ ः कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेला ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान.

Marathi News Esakal
www.esakal.com