बारामती नगरपालिकेची ऐतिहासिक कमान जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

गेल्या 50 वर्षांपासून बारामतीच्या अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार असलेली बारामती नगरपालिकेची कमान काल रात्री अचानकच नगरपालिकेने जमीनदोस्त केली. 

बारामती : गेल्या 50 वर्षांपासून बारामतीच्या अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार असलेली बारामती नगरपालिकेची कमान काल रात्री अचानकच नगरपालिकेने जमीनदोस्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सन 1967 मध्ये बारामती नगरपालिकेच्या इमारतीबाहेर या कमानीची निर्मिती तत्कालीन नगराध्यक्ष जयराम पांडुरंग सातव व उपनगराध्यक्ष माणिकलाल तुळजाराम शहा (वाघोलीकर) यांच्या कारकिर्दीत केली होती. त्या काळी ही कमान उभारण्यास अवघे आठ हजार रुपये लागले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बारामतीचा कोणताही संदर्भ आल्यानंतर दोन गोष्टी प्रामुख्याने पुढे यायच्या. त्यात भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ व बारामती नगरपालिकेची कमान. बारामतीची ओळख असलेली आणि असंख्य ऐतिहासिक घडामोडींची साक्षीदार असलेली ही कमान काल रात्री पाडून टाकली गेली. आज सकाळी बारामतीकर घराबाहेर पडल्यानंतरच ही कमान पाडून टाकल्याचे पुढे आले. बारामतीच्या वैभवात भर टाकणारी ही वास्तू होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेकदा बारामतीत इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांकडून मुलाखती घेण्यासाठी व बारामतीची ओळख ठळकपणे अधोरेखित होण्यासाठी या कमानीचाच वापर केला जायचा. आता मात्र ही कमान इतिहास बनून राहणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Historical Point Destroyed of Baramati Municipality