
जुन्नर : हडसर ता.जुन्नर येथील ऐतिहासिक गडावर संवर्धनाचे काम सुरू असताना मिळालेल्या तोफेवर फारसी शिलालेख आढळून आला. तोफेवर कोरलेला फारसी भाषेतील शिलालेखाचे पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाचे प्रा.राजेंद्र जोशी यांनी नुकतेच वाचन केले. हा शिलालेख इ.स. १५९०-९१ (हिजरी ९९८)चा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे इतिहासाचा एक अमूल्य पुरावा मिळाला असल्याचे मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्थेचे अमोल ढोबळे यांनी सांगितले.