

गोदा ते नर्मदा जलप्रवास: कुकडी-घोड खोऱ्यातील पवित्र जल महेश्वरकडे मार्गस्थ; येडगाव धरणावर जलकलशाचे मोठ्या उत्साहात पूजन!
Sakal
नारायणगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-2026 निमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेत सहभागी होण्यासाठी कुकडी-घोड खोऱ्यातील पवित्र जल कलशामध्ये घेऊन जल कलश नारायणगाव येथून जल यात्रेसाठी मार्गस्थ झाला. अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी दिली.