Pune Crime : डॉक्टरकडे खंडणी मागणाऱ्या सराईत गुंडाला अटक

डॉक्टरकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक.
extortion money

extortion money

Sakal
Updated on

पुणे - येरवडा परिसरातील एका डॉक्टरकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. अमोल जिवराज पिल्ले (वय ४६, रा. जयजवान नगर, येरवडा) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पुण्यासह कर्नाटकात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे ५८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com