Hit and Run Case : उंड्री 'हिट ॲण्ड रन' प्रकरणातील पसार झालेल्या वाहनचालकाला अटक

भरधाव मोटार चालवून 'मॉर्निंग वॉक'ला गेलेल्या व्यक्तीला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहनचालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली.
Accused Smir Kad
Accused Smir Kadsakal
Updated on

पुणे - भरधाव मोटार चालवून 'मॉर्निंग वॉक'ला गेलेल्या व्यक्तीला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहनचालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली.

समीर गणेश कड (वय-३२, रा. गंगोत्री कॉम्प्लेक्स, होले वस्ती चौक, उंड्री, पुणे) असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

उंड्रीतील न्याती इबोनी सोसायटीजवळ रस्त्यावर मंगळवारी (ता. १) सकाळी भरधाव मोटारीने धडक दिल्याने सुजितकुमार बसवंत प्रसाद सिंह (वय ४९, रा. बी-५, विद्यानिकेतन, हांडेवाडी रोड, उंड्री) यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजितकुमार सिंह सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सिंह यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिंह हे एका कंपनीत सिक्युरिटी मॅनेजर म्हणून काम करीत होते.

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे वाहनचालकाचा शोध घेत असताना पोलिसांना मोटारीबाबत माहिती मिळाली. परंतु मोटारीची नंबरप्लेट दिसून येत नव्हती.

पोलिसांनी आणखी काही सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू ठेवत पसार झालेल्या वाहन चालकाला आज हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील तरडे गावातून ताब्यात घेतल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com