हेड कोचीच्या पोलिस आयुक्तांची बदली

हेड
कोचीच्या पोलिस आयुक्तांची बदली
Published on: 

लोगो ः ‘हिट अँड रन’ प्रकरण

तिरुअनंतपुरम, ता.२८ (पीटीआय) ः केरळममधील ‘हिट अँड रन’ केस प्रकरणी राज्य सरकारने आज कारवाईचा बडगा उगारला आहे. कोचीचे पोलिस आयुक्त कालिराज महेशकुमार यांची तडकाफडकी बदली करतानाच त्यांच्या जागी आर.निशांथिनी यांना नेमण्यात आले आहे. एका आलिशान मोटारीने धडक दिल्याने पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा संबंधित मोटार अतिरिक्त सत्र न्यायाधीशाचा मुलगा चालवीत होता. केरळम पोलिसांनी हे प्रकरण निष्काळजीपणे हाताळल्याचा आरोप होतो आहे. या प्रकरणी चेरानल्लूर पोलिस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशी प्रक्रियेमध्ये त्रुटी ठेवल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली होती. या अपघातानंतर मृतांचे कुटुंबीय तसेच नातेवाइकांनी आंदोलन करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या दुर्घटनेनंतर संबंधित अल्पवयीनास तातडीने सोडण्यात आले होते. पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृतांचे कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीतून संबंधित मोटार ताशी शंभर किलोमीटर एवढ्या वेगाने धावत असल्याचे निष्पन्न झाले होते. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आरोपीच्या घराचीही तपासणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com