अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू;

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू;
Published on

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
लऊळ, ता. ६ : पंढरपूर-कुर्डुवाडी मार्गावरील ढोरेवस्ती परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. ५) सायंकाळी झालेल्या या अपघाताप्रकरणी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन कोंडीराम चांदणे (वय ७५, रा. लऊळ, ता. माढा) या आपल्या मुलाच्या वस्तीवरून पायी लऊळकडे जात होत्या. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ढोरेवस्ती परिसरात भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी त्यांना रुग्णवाहिकेतून कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी त्यांचा मुलगा पांडुरंग कोंडीराम चांदणे (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविणे, अपघातानंतर जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पसार होणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com