अ‍ॅड. डावखरेंच्या नावाचा जिल्हा बँकेसाठी ठराव

अ‍ॅड. डावखरेंच्या नावाचा जिल्हा बँकेसाठी ठराव
Published on

शिक्रापूर, ता. १९ : हिवरे (ता. शिरूर) येथील राजकीय नाळ डावखरे कुटुंबाशी कायम जोडलेली राहिली असून, यंदाच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही गावाने ही परंपरा कायम ठेवली आहे. माजी विधान परिषद उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांना जिल्हा बँकेसाठी मतदार प्रतिनिधी म्हणून गावाने एकमुखी ठराव दिला.
दिवंगत वसंतराव डावखरे यांनी हिवरेच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक (सन १९८४) व महापौर झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेचे (सन १९९२ पासून) सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले. तब्बल १८ वर्षे विधान परिषदेचे उपसभापती म्हणून काम करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या पश्चात अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनीही कोकण पदवीधर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विधान परिषद गाठली आहे.
दरम्यान, कासारी येथे झालेल्या मारामारी व वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तात ठराव घेण्यात येत आहेत. अशा स्थितीत हिवरेतील ठराव मात्र एकमताने पार पडला, अशी माहिती
दरम्यान, जिल्हा बँकेसाठी बन्सीलाल कांताराम पऱ्हाड यांच्या नावाचा एकमुखी ठराव झाल्याची माहिती माजी सरपंच प्रमोदशेठ पऱ्हाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur District Central Cooperative Bank election
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Satara District Bank Election
Kolhapur District Bank election 2027 voter list update
Marathi News Esakal
www.esakal.com