ज्येष्ठ पत्रकार एच.के. दुआ यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार एच.के. दुआ यांचे निधन

Published on

सकाळ न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली, ता. ४ ः ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि राज्यसभेचे माजी सदस्य एच.के. दुआ (वय ८८) यांचे आज राजधानी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
दुआ यांचा जन्म एक जुलै १९३७ रोजी झाला होता. राजकीय विषयांवरील सखोल ज्ञान आणि संपादकीय स्वातंत्र्यासाठी ओळखले जाणारे दुआ यांनी १९८७ ते १९९४ दरम्यान ‘द हिंदुस्तान टाइम्स’चे संपादक, १९९४ ते १९९६ दरम्यान ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य संपादक, १९९७-९८ दरम्यान ‘द टाइम्स ऑफ इंडिया’चे तसेच २००३ ते २००९ दरम्यान ‘द ट्रिब्यून’चे संपादकीय सल्लागारपद भूषविले होते. पत्रकारितेतील मोलाच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. 
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांची २००९ ते २०१५ या काळात राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि एच.डी. देवेगौडा यांचे ते माध्यम सल्लागार होते. २००१ ते २००३ दरम्यान डेन्मार्कचे राजदूत म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 
गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या दुआ यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्यावर उद्या (ता.५) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरुर, मनीष तिवारी, अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी दुआ यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com