खडकीतील हॉकीपटूंचा मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पुणे ः महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खडकीतील हॉकी खेळाडूंचा गौरव करण्यात आला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून खेळाडूंना मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

पुणे ः महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खडकीतील हॉकी खेळाडूंचा गौरव करण्यात आला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून खेळाडूंना मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस (29 ऑगस्ट) देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनाअंतर्गत महाराष्ट्र हॉकीच्या वतीने दरवर्षी हॉकी खेळातील विशेष योगदानाबद्दल व उत्कृष्ट खेळाडूंना या पुरस्काराने सम्नानित केले जाते. यंदा हा मान खडकीतील खेळाडूंना मिळाल्याने खडकीत त्यांचे कौतुक होत आहे. 
खडकीतील आंतरराष्ट्रीय खेळाडू अजित लाक्रा, राष्ट्रीय खेळाडू सुधीर क्षेत्रे, नरेंद्र निमल, अजिज इराणी व सागर ठाकूर या खेळाडूंना लेफ्ट. जनरल टी. निंबोरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. बालेवाडी क्रीडा संकुल येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यात राज्य शासनाचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, महाराष्ट्र हॉकीचे अध्यक्ष हितेश जैन, सरचिटणिस मनोज भोरे, काका पवार, गौरव नाटेकर, आनंद व्यकेश्‍वर आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे युवा व नवोदित हॉकी खेळाडूना निश्‍चितपणे प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी व्यक्त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hockyplayer in the rock honors DhaynChand award in Khadki