आळे येथे होलम काठी पालखीचे स्वागत

आळे येथे होलम काठी पालखीचे स्वागत

Published on

आळेफाटा, ता. २९ : ‘सदानंदाचा येळकोट,’ ‘भैरवनाथांचं चांगभल’ अशा जयघोषात संगमनेर तालुका या ठिकाणाहून जेजुरी येथे जाणाऱ्या होलम काठीचे गुरुवारी (ता. २९) आळे (ता. जुन्नर) येथे आगमन झाले. यावेळी या होलम काठीची आरती करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने होलम काठीचे स्वागत करण्यात आले.
जेजुरी येथे माघ पौर्णिमेस होणाऱ्या यात्रेनिमित्त मानाच्या शिखर काठ्यांच्या मिरवणुकीत संगमनेर येथील होलम काठी १२०० पासून आजपर्यंत संगमनेर येथून येत असते. या मानाच्या होलम काठीचे आज आळे येथे आगमन झाले. यावेळी भंडाऱ्याची उधळण करत ग्रामस्थांनी या मानाच्या होलम काठीचे स्वागत केले.
यावेळी या काठी पालखीच्या आरतीचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रसन्न डोके, माउली कुऱ्हाडे, प्रसन्न डोके, नयना डोके, सरपंच मुकुंद भंडलकर, रमेश कुऱ्हाडे, अविनाश कुऱ्हाडे, संजय कुऱ्हाडे, संदीप कुऱ्हाडे, कैलास शिरतर, आनंद शिरतर, संजय भुजबळ यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते. या आरतीच्या कार्यक्रमानंतर मानाच्या काठीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर या मानाच्या होलम काठीचे जेजुरीकडे प्रस्थान झाले. यावेळी भाविकांनी या काठी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com