आश्रम शाळेत कार्यक्रम
VRG26B06253
वैराग (ता. बार्शी) : इंदिरानगर येथील आश्रमशाळेत होळीचे पूजन करताना मान्यवर.
---
इंदिरानगर येथील आश्रमशाळेत होळी साजरी
वैराग : येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, इंदिरानगर येथे होळी सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जय जगदंबा परिवाराचे कपिल कोरके, प्राचार्य खंडेराया घोडके व प्रा. नरहरी कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल पोटफोडे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहशिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी मुला- मुलींना खाऊ वाटप केला. तसेच आश्रमशाळेतील मुला- मुलींना पुरणपोळीचे गोड जेवण दिले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब वाळके यांनी सूत्रसंचालन केले. सहशिक्षक चंद्रकांत घायतिडक यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

