Railway
sakal
पुणे - होळीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. यात पुण्याहून नागपूर, दानापूर व गोरखपूरला जाणाऱ्या रेल्वेंचा समावेश केला आहे. या मार्गांवर रेल्वेच्या ४८ फेऱ्या होणार असून यातून सुमारे एक लाख २० हजार प्रवाशांची वाहतूक होण्याचा अंदाज आहे. विशेष रेल्वेमध्ये वातानुकूलित डब्यांचा समावेश केला आहे.