

पक्षाला भरभराट यावी, सर्व विरोधकांत एकी व्हावी, यासाठी 'सर्व सिद्धी' पुजा करून होम-हवन करण्याची घटना पुण्याच्या काँग्रेस भवन मध्ये नुकतीच घडली.
पुणे - पक्षाला भरभराट यावी, सर्व विरोधकांत एकी व्हावी, यासाठी 'सर्व सिद्धी' पुजा करून होम-हवन करण्याची घटना पुण्याच्या काँग्रेस भवन मध्ये नुकतीच घडली.
पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये रविवारी सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान अध्यक्षांच्या केबिनच्या शेजारील सभागृहात होम-हवन झाले. पुजेचे विधी झाले. या विधींची तयारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच सुरू होती. सर्व स्वच्छता करून दुपारी दीडच्या सुमारास त्या सभागृहाला कुलूप लावण्यात आले. काँग्रेस भवनमध्ये रविवारी कार्यकर्त्यांची वर्दळ कमी असते, हे लक्षात घेऊन त्यासाठी हा मुहूर्त निवडला, अशी चर्चा पक्ष वर्तुळात आहे.
पुण्यातील शिवाजीनगर मधील काँग्रेस भवनची स्थापना 1940 मध्ये झाली आहे. काकासाहेब गाडगीळ शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. धर्मनिरपेक्षता, हे तत्व अंगीकारलेल्या काँग्रेस भवनमध्ये 82 वर्षांत पहिल्यांदाच होम- हवन झाले आहे.
याबाबत राष्ट्रीय आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, "महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेस भवन मध्ये होम-हवन होणे ही चुकीची घटना आहे. अशा प्रकारांमुळे काँग्रेस पक्ष भाजपची नक्कल करीत आहे, असे वाटू शकते. त्यामुळे काँग्रेसने या घटनेचा फेरविचार करणे गरजेचे आहे. पक्षासाठी हा आत्मघातकी प्रकार आहे. "
या वाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, "काँग्रेस पक्षाची भरभराट व्हावी, पक्षाचा सुवर्णकाळ पुन्हा यावा, या उद्देशाने कार्य सिद्धी पूजा केली. त्यामध्ये होम-हवनही होते. तसेच विविध प्रकारच्या पुजांचाही त्यात समावेश होता. काँग्रेसचा शहराध्यक्ष मी सात जुलै रोजी झालो. तेव्हापासूनच काँग्रेस भवनमध्ये पुजा करण्याचे माझ्या मनात होते. परंतु 14 नोव्हेंबर नंतर पूजा करण्यास मला गुरूंनी सांगितले होते. शुक्राचा अस्त झाला असल्यामुळे, ही पूजा केली आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.