पुणे - ‘घार उडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी’ या ओळींप्रमाणे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम संपताच हरवलेली कौटुंबिक ओल पुन्हा एकदा घराघरांत जाणवू लागली. .प्रभाग क्रमांक २५ अ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार अमृता गणेश भोकरे आणि गणेश सोमनाथ भोकरे यांच्यासाठी प्रचाराचा शेवट हा केवळ राजकीय टप्पा नव्हता, तर भावनांनी ओथंबलेला क्षण ठरला. प्रचाराच्या धावपळीत आई-वडिलांचा सहवास कमी मिळालेला चिमुकला अखेर त्यांच्या कुशीत विसावला आणि घरात हसऱ्या क्षणांनी पुन्हा जागा घेतली..गेल्या पंधरा दिवसांत गल्लीबोळ, वस्ती, चौका-चौकांत फिरत मतदारांशी संवाद साधला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सभा, बैठका, घराघरांत भेटी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू होत्या. या काळात चिमुकल्याची जबाबदारी आजी-आजोबा आणि नातेवाइकांनी सांभाळली..मात्र प्रचार थांबताच भोकरे दाम्पत्याने सर्वप्रथम मुलाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. खेळणी, गोष्टी, त्याचे लाड या साऱ्या क्षणांतून प्रचाराचा ताण नकळत दूर झाला. आई-बापाच्या कुशीत विसावलेला चिमुकला पाहून कार्यकर्ते आणि समर्थकही भावुक झाले.‘लोकांसाठी झटताना कुटुंबाचा आधारच खरी ऊर्जा देतो,’ अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि आपुलकी यामुळे आत्मविश्वास वाढल्याचे भोकरे दाम्पत्याने सांगितले..दरम्यान, प्रचार सांगतेवेळी भोकरे यांनी मतदारांनी मतरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचा हक्क बजावून माझ्यासारख्या कार्यकर्तीला जनसेवेची संधी माझ्या प्रभागातील नागरिक देतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.