

हिंजवडी, ता. १४ : जांबे ग्रामपंचायत हद्दीतील घरनोंदणी, घरपट्टी आकारणी आणि अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यातून नागरिक व प्रशासनात वादाचे प्रसंग घडत असल्याने नियमावली, आवश्यक कागदपत्रे आणि शासनमान्य शुल्क जाहीर करण्याची मागणी गावकऱ्यांतून होत आहे.
गावाचा विस्तार होत असताना नवीन घरांची नोंद कोणत्या नियमानुसार करावी, विनापरवाना बांधकामांच्या नियमितीकरणासाठी कोणत्या प्राधिकरणाची परवानगी घ्यावी, याबाबत स्पष्टता नसल्याने गावकऱ्यांचा गोंधळ उडत आहे. घरनोंदणीच्या नावाखाली आर्थिक लूट होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घरनोंदणी व बांधकाम नियमितीकरण या स्वतंत्र प्रक्रियांतील फरक स्पष्ट करावा. ग्रामपंचायत दप्तरी नोंद झाल्याने बांधकाम अधिकृत ठरते का ? याबाबत माहिती द्यावी तसेच कागदपत्रांची यादी सूचना फलकावर लावावी. घरपट्टी, नोंदणी शुल्क, दंडाचा तपशील जाहीर करून प्रत्येक आकारणीची पावती द्यावी. अर्जापासून अंतिम नोंदीपर्यंतची कार्यपद्धती स्पष्ट करावी, अशा मागण्या नागरिकांकडून होत आहेत.
घरनोंदणी आणि बांधकाम नियमितीकरणाबाबतचे शासन निर्णय, कायदेशीर तरतुदी व सक्षम प्राधिकरणाचे आदेश ग्रामपंचायतीने सार्वजनिक करावेत. नागरिकांच्या कायद्याविषयीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी आर्थिक शोषण करत आहेत. अधिकृत नियम आणि शुल्क स्पष्ट झाल्यास नागरिकांची दिशाभूल व आर्थिक लूट रोखता येईल.
- अनुप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, जांबे
नागरिकांच्या सुविधेसाठी काही उपाययोजना करण्याचे विचाराधीन आहे. घरनोंदणीसाठी कोणत्याही आर्थिक लुटीला बळी पडू नये. सर्व नियमावली आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात दिली जाते. नोंदणीसाठी अथवा अन्य कोणत्याही कामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने माझ्याकडे तक्रार करावी.
- आसमा नाईकवाडी, ग्रामपंचायत अधिकारी, जांबे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.