esakal | #AtHomeWithSakal: आजचं चॅलेंज घेऊन आलीये नम्रता गायकवाड
sakal

बोलून बातमी शोधा

At home with Sakal challenge by Namarta Gaikwad

#AtHomeWithSakal: आजचं चॅलेंज घेऊन आलीये नम्रता गायकवाड

#AtHomeWithSakal: आजचं चॅलेंज घेऊन आलीये नम्रता गायकवाड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे: कोरोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट आलं आहे. त्यातंच या महारोगराईचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारचे पयत्न चालू आहेत. देशातील या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवस देश लॉकडाऊन केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे साहजिकच या लॉकडाऊनमुळे घरी बसून सगळ्यांनाच कंटाळा आला आहे. पण डोन्ट वरी लॉकडाऊनच्या या काळात सकाळ माध्यम समुह तुमच्यासोबत असणार आहे. तुमचा वेळही योग्य मार्गी लावणार आहे, कारण तुमच्या या काळात तुमच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत  #AtHomeWithSakal ही स्पर्धा.

घरातील महिलावर्ग रोज तेच तेच काम करुन कंटाळल्या असतील..हो ना? म्हणूनच दररोजच्या कामातून थोडा वेळ काढत तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊन घरबसल्या बक्षिसं मिळवू शकतात. तुम्हालाही थोडासा ब्रेक नाही का? तर मग महिलावर्गाला ७ दिवस सलग सहभागी व्हायचं आहे फॅशन शोमध्ये. यासाठी आम्ही तुम्हाला दररोज एक थीम सांगणार आहोत. त्या थीमप्रमाणे तुम्ही पोशाख करायचा. एक कॅटवॉक करायचा, मस्त पोझ द्यायची आणि याचा एक व्हिडिओ तयार करुन आम्हाला पाठवायचा. हा व्हिडिओ तुम्ही आम्हाला  #AtHomeWithSakal वापरुन टॅग करायचा आणि मग यातल्याच विजेत्यांना मिळणार आहेत आकर्षक बक्षिसं. चला तर मग आजच्या थीमसाठी तयार आहात ना? आजची थीम आहे- ब्ल्यु म्हणजेच निळा रंग

आज तुम्हाला निळ्या रंगाचा तुमचा आवडता कोणताही पोशाख करायचा आहे आणि वरिल सांगितलेल्या गोष्टी फॉलो करुन आम्हाला व्हिडिओ पाठवायचा आहे. सो लेट्स गो आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहतोय...

loading image