
#AtHomeWithSakal: आजचं चॅलेंज घेऊन आलीये सोनाली कुलकर्णी
पुणे: कोरोनाच्या काळात देशातील नागरिक लॉकडाऊनमुळे घरातंच वेळ घालवत आहे. मात्र घरात बसुन काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडलाय. तुम्हालाही कंटाळा आला असेल ना? कंटाळा आला असेल बसुन घरी पण सकाळ असताना डोन्ट वरि. होय, या लॉकडाऊनच्या काळात सकाळ माध्यम समुह तुमच्यासोबत आहे आणि म्हणूनंच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत #AtHomewithSakal ही स्पर्धा. या स्पर्धेतुन तुम्हाला मिळणार आहेत घरबसल्या भरगोस बक्षिसं.
महिलांना या स्पर्धेत त्यांच्या आवडीची गोष्ट करायची आहे. बरोबर ओळखलं..नट्टापट्टा आणि फोटो-व्हिडिओ अर्थात ७ दिवसांचा हा फॅशन शो आहे. या फॅशन शो मध्ये दररोज आम्ही तुम्हाला एक थीम देणार आहोत. त्याप्रमाणे तुम्ही ड्रेसअप व्हायचं, नट्टापट्टा करायचा, मस्तपैकी एक कॅटवॉक करायचा आणि हा व्हिडिओ तयार करुन आम्हाला पाठवायचा. हा व्हिडिओ आम्हाला #AtHomewithSakal वापरुन टॅग करा आणि शेअर करा.
चला तर मग आजच्या थीमसाठी तयार आहात ना. तर आजची थीम आहे ब्लॅक ड्रेस. ब्लॅक ड्रेस घालून तुम्ही तयार व्हायचंय आणि वर सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूच...