
पुणे : शहरातील रेल्वे, बस स्थानक, मंदिर, मशीद किंवा दर्ग्यावरील बेघर व मानसिक रुग्णांना विविध स्वयंसेवी संस्थांनी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. त्यांना दाखल करताना संस्थांनी त्यांना विजय, विमल, जॉन, मेरी, अकबर किंवा शबाना अशी नावे दिली. ते उपचार घेऊन बरे झाले. तरी सुद्धा त्यांच्या कागदपत्रांवर त्यांची ओळख दाखल करतानाचीच राहिली. मात्र कोरोनाच्या संसर्गात त्यांना कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशील्ड देण्यासाठी आधारकार्डची आवश्यकता होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नातून मनोरुग्णालयातील बेघर साडेतीनशे रुग्णांचे आधारकार्ड काढले. त्यामुळे त्यांची आता केवळ लसीकरण होणार नाही तर त्यांना सरकारी नवीन ओळख मिळाल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा सुध्दा मार्ग मोकळा झाला आहे.
मनोरूग्णालयांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक बरे झालेले रुग्ण आहेत. यातील काही बेघर तर काहींना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून त्यांचा मुक्काम मनोरुग्णालयातच आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारला बरे झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतीत कागदपत्रे नसल्याची मुख्य अडचण होती. कारण विविध स्वयंसेवी संस्था, पोलिसांनी मनोरुग्णांना न्यायालयाच्या आदेशाने मनोरुग्णालयात दाखल केले. मात्र त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याच कागदपत्रांचा पुरावा नव्हता. त्यांना संबंधितांनी ज्या नावाने सरकारी कागदपत्रात नोंद केली तिच त्यांची ओळख झाली.
हेही वाचा - पुणेकरांनो नीट वाचा; असा असणार आहे ‘विकेंड लॉकडाउन’
कोव्हिडच्या संसर्गात मनोरुग्णालयातील परिचारिकांपासून ते डॉक्टरांचे लसीकरण झाले. कागदपत्रे असलेल्या रुग्णांच्या लसीकरणात अडचण नव्हती. मात्र बेघर व बरे झालेल्या रुग्णांना लसीकरण आधारकार्ड शिवाय शक्य नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ही माहिती दिली. त्यानंतर देशमुख यांनी विशेष बाब म्हणून साडेतीनशे रुग्णांचे आधारकार्ड काढण्याची परवानगी दिली. त्यावर त्यांची रुग्णालयात दाखल असलेल्या नावांचा उल्लेख आहे. मात्र त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागल्यानंतर आधारकार्डवर त्यांच्या नावाची दुरुस्ती होऊ शकते. आधारकार्डमुळे त्यांचे लसीकरणाचा तर प्रश्न सुटणार आहे. त्यासोबतच भविष्यात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुध्दा सुटणार असल्याचे डाॅ. फडणीस यांनी सांगितले.
हेही वाचा - पुणेकरांनो सवलतींचा गैरवापर नको; लॉकडाऊनमध्ये विनाकारण हिंडणाऱ्यांवर कारवाई
‘‘ येरवडा मनोरुग्णालयातील १५५ पुरुष तर १७७ महिला रुग्णांचे आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांचे आता लसीकरण करणे शक्य होणार आहे. यासह भविष्यात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागू शकतो.’’
- डॉ. अभिजीत फडणीस, अधिक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरूग्णाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.