Pune Crime : ‘गे डेटिंग अँड चॅट’ ॲपवरून तरुणाला लुटणारे दोघेजण ताब्यात

फिर्यादी तरुणाला आरोपींनी डेटिंग ॲपवरून चॅटिंग करून भेटायला बोलावले. आणि.....
pune crime

pune crime

sakal

Updated on

वारजे - ‘गे डेटिंग अँड चॅट’ ॲपद्वारे तरुणांना जाळ्यात ओढून त्यांना मारहाण करत लुटणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांना वारजे माळवाडी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाला आरोपींनी डेटिंग ॲपवरून चॅटिंग करून भेटायला बोलावले. प्रत्यक्ष भेटल्यानंतर आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या मोबाईलवरून जबरदस्तीने ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून घेत चांदीची साखळी हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर तरुणाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com