
महाराष्ट्रदिनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रके देऊन केला सन्मान
उंड्री : महाराष्ट्र व कामगार दिनी पिसोळीतील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयामध्ये मुख्याध्यापक चंद्रकांत काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांना गुणपत्रके देऊन गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रवी फुले, सोपान आघाव, सोमनाथ ढोरे, विशाल पाटील, दत्तू धायगुडे, अर्चना पालवे, विशाल पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या उंड्री शाळमध्ये मुलांना गुणपत्रके देऊन गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुढील वर्षी चांगला अभ्यास करा, असा संदेश मुख्याध्यापक मिलिंद थोरात यांनी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी राजेंद्र कुंभारकर, माधव शिंदे, संजय खोपडे, सुरेखा माटे, मुक्ता कटके, अर्चना कुंभारकर, सुनिता खोपडे, पूनम वेदपाठक, सीमा आदलिंगे, वाजिदा शेख, वैशाली वाघ, आरती ठाकरे, भूप्रिया नडे, वैशाली आठवले आणि विद्यार्थी उपस्थित होते.