
पुणे : डासांपासून फैलावणाऱ्या डेंगीवर प्रभावी आणि परवडणारी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन संस्था (ड्रग्ज फॉर निग्लेक्टेड डिसिजेस इनिशिएटिव्ह-डीएनडीआय’ यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानुसार विशिष्ट प्रतिपिंडे तयार करण्यात आली या औषधाची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सूरू आहे. त्यानंतर औषध बाजारात येईल.