
पुणे : जिल्ह्यात घरकुलांसाठी पात्र असलेल्या; परंतु स्वतःची जमीन नसलेल्या ९७६ भूमिहीन नागरिकांना घरकुले मंजूर झाली आहेत. त्यासाठी गायरान जमिनीचा उपयोग करून लाभार्थ्यांना बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.