भरपाई दाव्यासाठी रेल्वे करणार सहकार्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

पुणे - होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा पंचायत, आम आदमी पक्ष यांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांची भेट घेतली. या वेळी रेल्वेकडून संपूर्ण साह्य देण्यात येईल, तसेच दुर्घटनेतील मृत व जखमींना कायदेशीर मदत देण्याचे आश्‍वासन देऊस्कर यांनी दिले.

या वेळी बोलताना शिरोळे म्हणाले, की प्रशासनाने या चुकीतून धडा घ्यावा. तसेच दुर्घटनाग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक साह्य मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या वेळी रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दक, श्रीकांत आचार्य, आनंद अंकुश यांनी सहभाग घेतला. दरम्यान या प्रतिनिधींनी पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांची भेट घेऊन या गुन्ह्यात अपघाताची कलमे लावा, अशी मागणी केली. 

या वेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांसह अधिकारी उपस्थित होते.

कुटुंबीयांनी स्वीकारली मदत
अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या उमेश मोरे यांना आर्थिक मदत करताना काही अडचणी येत होत्या. त्यामध्ये पोचपावतीच्या काही अटी होत्या, त्या अटी काढून टाकत रेल्वे प्रशासनाकडून एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश या वेळी देण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hording Accident Compensation Railway