नेता खुर्चीवर तर कार्यकर्ता बाकावर, झळकले होर्डींग 

दिलीप कु-हाडे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

येरवडा - शहरातील एका बड्या नेत्यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. उपनगरातील एका उत्साही कार्यकर्त्याने या नेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. वाढदिवस असल्याची जाहिरात करण्यासाठी चौक, बस थांबे, गल्ली-बोळात विना परवाना होर्डिंग व फलक लावले. मात्र या कार्यकर्त्याने लावलेले होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. कार्यकर्त्याने आपला नेता सर्वांना बरोबर घेऊन जात असल्याचे सांगण्यासाठी छायाचित्राचा कल्पकतेने वापर केला. त्याने चक्क अलिशान खुर्ची शेजारी लोखंडी बाक असलेले छायाचित्र होर्डिंगवर झळकविले.

येरवडा - शहरातील एका बड्या नेत्यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. उपनगरातील एका उत्साही कार्यकर्त्याने या नेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. वाढदिवस असल्याची जाहिरात करण्यासाठी चौक, बस थांबे, गल्ली-बोळात विना परवाना होर्डिंग व फलक लावले. मात्र या कार्यकर्त्याने लावलेले होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. कार्यकर्त्याने आपला नेता सर्वांना बरोबर घेऊन जात असल्याचे सांगण्यासाठी छायाचित्राचा कल्पकतेने वापर केला. त्याने चक्क अलिशान खुर्ची शेजारी लोखंडी बाक असलेले छायाचित्र होर्डिंगवर झळकविले. अर्थात आपला नेता खुर्चीवर बसून सर्व सामान्य कार्यकर्त्यांना आपल्या बरोबरीचे स्थान देण्यासाठी त्यांना लोखंडी बाकावर बसवितो हे दाखविण्याचा प्रयत्न केला. या होर्डिंग व फलकांवरील छायाचित्रामुळे नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. 

खुर्ची कोणतीही असली तरी तिला महत्त्व असते. राजकारणी मंडळींच्या खुर्चीला तर फारच महत्त्व असते. राजसत्तेच्या खुर्चीमुळे साम, दाम आणि दंडाची कामे होतात. त्यामुळे या खुर्चीचा मोह कोणालाही आवरत नाही. एकदा ही खुर्ची मिळाली की ती सोडावीशी वाटत नाही. या खुर्चीचा मोह किंवा महत्त्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नसेल तर नवलच म्हणावे लागेल. नेत्यांनी कार्यकर्त्यांना आर्थिक ताकद किंवा एखाद्या लाभाचे पद दिले तर ते उत्साहाने काम करतात. मात्र सर्वंच नेते कार्यकर्त्यांना लाभाचे पद सोडा पण आर्थिक ताकद देतात असे नाही. जे ताकद देतात त्यांचे ऋण फेडण्यासाठी कार्यकर्ते सतत प्रयत्नात असतात. तर कोणतेही पद न मिळालेला सर्वसामान्य कार्यकर्ता शेवट पर्यंत पक्षाचा झेंडा आणि सतरंजा उचलण्यापर्यंतच राहतात. त्यांचे कुठे नाव असते ना प्रसिद्धी. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कार्यकर्ता नेत्याला जाब विचारू शकतो. याची जाणिव झाल्याचे हे बोलके छायाचित्र आहे.

Web Title: hording published on the occasion of a position's b'day