esakal | Video : हॉर्नच्या नियंत्रणासाठी यंत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Video : हॉर्नच्या नियंत्रणासाठी यंत्र

शहरामध्ये जसा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, तसाच कर्णकर्कश हॉर्नचासुद्धा! सिग्नलवर, प्रतिबंधित ठिकाणी, गर्दीत अथवा मोकळ्या रस्त्यावर विनाकारण हॉर्न वाजविणारे चालक आपल्याला नेहमीच दिसतात. हॉर्न वाजविल्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होतेच; पण त्याचबरोबर आरोग्याशी निगडित प्रश्‍नसुद्धा उद्भवतात. यावर पुण्यातील गौरव कवठेकर यांनी नामी शक्कल शोधली आहे.

Video : हॉर्नच्या नियंत्रणासाठी यंत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे-  शहरामध्ये जसा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, तसाच कर्णकर्कश हॉर्नचासुद्धा! सिग्नलवर, प्रतिबंधित ठिकाणी, गर्दीत अथवा मोकळ्या रस्त्यावर विनाकारण हॉर्न वाजविणारे चालक आपल्याला नेहमीच दिसतात. हॉर्न वाजविल्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होतेच; पण त्याचबरोबर आरोग्याशी निगडित प्रश्‍नसुद्धा उद्भवतात. यावर पुण्यातील गौरव कवठेकर यांनी नामी शक्कल शोधली आहे.

इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या कवठेकर यांनी ‘कंट्रोल हॉन्क’ नावाचे यंत्र तयार केले आहे. ते म्हणाले, ‘‘या यंत्रामुळे शाळा, दवाखाने अशा प्रतिबंधित ठिकाणी गाडीचा हॉर्न वाजत नाही. तसेच, चालकाला हॉर्न वाचविण्यासाठी मर्यादित संधी यात देण्यात आल्या आहेत. एकदा का त्या संधी संपल्या, की हॉर्न वाजणे बंद! आणि जर पुन्हा त्या वाढवून घ्यायच्या असतील, तर संबंधित यंत्रणेकडे संपर्क साधावा लागतो.’’ जर चालकाने गाडी चालविताना हॉर्नचा वापर केला नाही, तर हॉर्न वाजविण्याच्या संधी हे यंत्र वाढवून देते.

पेटंट कार्यालयाच्या शासकीय नियतकालिकात फेब्रुवारी २०१८ मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. लवकरच याचे पेटंट मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. या संयंत्रामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणात तर घट होईल, तसेच वाहतुकीची एक महत्त्वाची समस्यासुद्धा मिटेल.

शहरात हॉर्नपासून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणात घट व्हावी, यासाठी मी हे संशोधन केले. प्रशासनाने दखल घेतल्यास हे संशोधन प्रत्यक्ष उपयोगात येईल.
- गौरव कवठेकर 

यंत्राची वैशिष्ट्ये
    आकाराने लहान, सर्व सूचना डिस्प्लेवर दिसणार
    इंटरनेट अथवा अतिरिक्त विजेची गरज नाही
    वाहतूक पोलिसांना चालकाची हॉर्नसंबंधीची सर्व माहिती ॲपद्वारे मिळणार

हॉर्नचे दुष्परिणाम
    शहरांतील ७० टक्के ध्वनिप्रदूषण वाहनांच्या हॉर्नमुळे
    दररोज आठ तास हॉर्नचा आवाज ऐकणाऱ्यांपैकी तीस टक्के लोकांना बधीरता
    मानसिक ताणतणाव, अस्वस्थता, डोकेदुखी यामध्ये वाढ
    जास्त तीव्रतेच्या हॉर्नमुळे तात्कालिक अथवा कायमस्वरूपाची बधीरता

loading image
go to top