pickup and car accident
sakal
- राजेश कणसे
आळेफाटा - अहिल्यानगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील गुळंजवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. बुधवारी (१० जून) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.