
पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कुडांई मेन्स पार्लरमध्ये घडलेल्या या थरारक घटनेत दुकानाची तोडफोड करून मालकावर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात दत्तात्रय वाघ (वय 22) गंभीर जखमी झाला असून, शिरूर पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.