Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थिनीवर युवकाने लग्नाला नकार देत असल्याच्या कारणावरून कोयत्याने जीवघेणा केला हल्ला.
Mahesh Damase

Mahesh Damase

sakal

Updated on

जुन्नर - जुन्नर शहराजवळील बारव पाडळी गावाच्या हद्दीत असलेल्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थिनीवर युवकाने लग्नाला नकार देत असल्याच्या कारणावरून कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. बुधवारी (ता. ११) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत महाविद्यालयीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. आरोपी महेश मुरलीधर डामसे (रा. आंबे, ता. जुन्नर) हा फरारी असून, जुन्नर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com