रुग्णालयातील राड्याने सरकारची कोंडी

रुग्णालयातील राड्याने सरकारची कोंडी
Published on

रुग्णालयातील राड्याने
सरकारची कोंडी
पोलिस अधीक्षकांना हजर राहण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पालघर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या गोविंदा पथकातील सहकाऱ्यांच्या नातेवाइकांकडून उपचारादरम्यान तपासणीचे पैसे मागितल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयात शिवीगाळ करत धुडगूस घातला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ८) गंभीर दखल घेतली आणि पालघर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांना बुधवारी (ता. ९) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.
डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रेंकडून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली होती. याची आठवण न्यायालयीन मित्र म्हणून उपस्थित असलेल्या निरंजन मुंदरगी यांनी दिली. त्याच घटनेची पालघरमध्येही पुनरावृत्ती झाल्याचे न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाला सांगितले. त्याच वेळी डॉक्टरांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा स्थानिक पोलिसांवर दबाव आणण्यात येत असल्याचेही मुंदरगी यांनी सांगितले. ही फार दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हणजे हे प्रकरण डोंबिवलीतील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीसारखेच आहे, असे निरीक्षण न्या. गडकरी यांनी नोंदवले आणि राज्य सरकारने काय पावले उचलली, अशी विचारणा केली. त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com