Pune : सत्कार स्वीकारला आणि वैद्यकीय अधीक्षक जाळ्यात सापडला

रूग्णालयातील शिपायाला दोन हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले
bribe
bribesakal
Summary

रूग्णालयातील शिपायाला दोन हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले

दौंड : दौंड उप जिल्हा रूग्णालयातील वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांना तीन हजार रूपयांची तर रूग्णालयातील शिपायाला दोन हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. तक्रारदाराने फेटा घालून क्लास वन श्रेणीतील डॅा. संग्राम डांगे यांचा सत्कार केल्यानंतर दहा मिनिटांतच दोघांना लाच घेताना पथकाने ताब्यात घेतले.

दौंड शहरातील एका तरूणाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र हरविल्याने दुबार प्रमाणपत्रासाठी त्यांनी उप जिल्हा रूग्णालयात अर्ज केला होता. परंतु क्लास वन श्रेणीतील अधीक्षक डॅा. संग्राम माणिकराव डांगे (वय ४६, सध्या रा. दौंड) व शिपाई नानासाहेब पांडुंरंग खोत (वय ५७, रा. दौंड) यांनी त्यासाठी पाच हजार रूपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने लाच देण्याची तयारी दर्शवून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार संशय येऊ नये याकरिता तक्रारदाराने १७ ऑक्टोबर रोजी डॅा. डांगे यांना एका दिवसात प्रमाणपत्र देणार असल्याबद्दल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर सापळ्यानुसार डॅा. संग्राम डांगे यांना तीन हजार व शिपाई नानासाहेब खोत यांना दोन हजार रूपये स्वीकारताना पथकाने ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक वीरनाथ माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. संशयित आरोपी डॅा. संग्राम डांगे व शिपाई नानासाहेब खोत यांना दौंड पोलिस ठाण्यात चौकशी व जाब जबाबासाठी आणण्यात आले आहे.

डॅा. संग्राम डांगे हे १८ डिसेंबर २०१९ पासून अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. बदली झाल्यानंतरही त्यांनी पदभार सोडला नव्हता व राजकीय वरदहस्तामुळे ते या पदावर कायम होते. लोकप्रतिनिधींसमोर त्यांच्या वागणुकीविषयी अनेकदा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी झाल्या होत्या पण कारवाई झाली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com