Pune News : ​वसतिगृहांमधील गर्दीने कोंडला पेठांचा श्वास; पायाभूत सुविधांवर ताण; पाणी, पार्किंग आणि कचऱ्याचा प्रश्न गंभीर

पुणे शहरात खासगी वसतिगृहांमध्ये क्षमतेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थी राहत असल्याने इमारतीच्या पाणी, वीज, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.
Private Hostel

Private Hostel

sakal

Updated on

पुणे - सकाळी सातची वेळ. सदाशिव पेठेतील एका इमारतीत पाण्याचा नळ सुरू होताच बादल्या, कॅन आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते. काही मिनिटांतच टाकी रिकामी होते आणि उर्वरित रहिवाशांना पाणी कमी दाबाने मिळते अथवा मिळतही नाही.

शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक इमारतींमध्ये सध्या हे चित्र नित्याचे झाले आहे. या भागांमधील खासगी वसतिगृहांमध्ये क्षमतेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थी राहत असल्याने इमारतीच्या पाणी, वीज, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. यातून केवळ विद्यार्थ्यांचीच नाही, तर स्थानिक रहिवाशांचीही चांगलीच गैरसोय होते आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com