

FDA Action
ESakal
पुणे - अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यासह राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर केलेल्या कारवाईनंतर त्याचा थेट परिणाम हॉस्पिटॅलिटी उद्योगावर दिसून येत आहे. कारवाईनंतर काही हॉटेल्समधील ग्राहकसंख्या १८ ते २० टक्क्यांनी घटली आहे.
एफडीएच्या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये संपूर्ण हॉटेल व्यवसायाबाबतच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एखाद्या हॉटेलवर कारवाई झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्या परिसरातील इतर हॉटेल्सकडेही ग्राहक संशयाच्या नजरेने पाहत आहेत. त्यामुळे चांगली गुणवत्ता आणि स्वच्छता राखणाऱ्या हॉटेल्सनाही या नकारात्मक वातावरणाचा फटका बसत आहे.