

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः देशाच्या शिक्षणक्षेत्रातील अनागोंदी चव्हाट्यावर आणणाऱ्या झुरळाने आता पंचतारांकित हॉटेलातील अस्वच्छतेचा मुद्दा चर्चेत आणला आहे. याला निमित्त ठरले फोर्टिस रुग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ अशोक सेठ... एका हॉटेलमध्ये सायंभोजनासाठी गेलेल्या सेठ यांना त्यांच्या जेवणाच्या थाळी जवळ झुरळ फिरताना दिसले, याचा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करत तो अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅगही केला.
या संदर्भात सेठ यांनी नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, की आमच्या जेवणाच्या टेबलावर एक अनपेक्षित पाहुणा आला, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारची घटना घडणे ही स्वच्छतेमधील मोठी चूक आहे. झुरळाला पाहून भूकच गेली. पिझ्झा किंवा पास्ता कितीही चांगला असला तरी निघून जाणेच योग्य होते. सेठ यांनी यानंतर ‘‘आपण मुंढे यांच्या भागामध्ये आहोत, त्याबद्दल आभार मानायला हवेत,’’ अशी सूचक प्रतिक्रियाही व्यक्त केली. दरम्यान सेठ यांच्या या पोस्टवर संबंधित पंचतारांकित हॉटेलने कोणतेही भाष्य केलेले नाही. सध्या मुंढे यांनी भेसळ करणाऱ्या आणि स्वच्छता न ठेवणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आता सेठ यांच्या तक्रारीवर ते काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.