
पुणे : लॉकडाउनमुळे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले हॉटेल आणि लॉज आता सुरू होणार आहेत. रूम असलेले हॉटेल आणि लॉज 33 टक्के क्षमतेत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील हॉटेल, लॉजिंग येत्या बुधवार (ता. 8) पासून सुरु होणार आहेत. याबाबतचा अध्यादेश आज जारी करण्यात आला आहे. हॉटेलमध्येय रेस्टॉरंट असलेले 50 हॉटेल पुणे शहरात आहेत.
पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
हा आदेश केवळ रूम असलेले हॉटेल आणि लॉज पुरता मर्यादित आहे. त्यामुळे केवळ जेवणाची सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांना आणि तेथील पदार्थांची चव चाखण्यास इच्छुक असलेल्यांना आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. लॉकडाऊनमुळे राज्यभरातील उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. मात्र 'मिशन बिगीन अगेन'च्या दोन टप्प्यांमध्ये अनेक व्यवसाय सुरू झाले होते. पण हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे हॉटेल सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. राज्यातील पर्यटनात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले होते. सरकारने तत्परता दाखवत अगदी दुसर्याच दिवशी याबाबत अध्यादेश काढला आहे.
आणखी वाचा - महापौरांच्या कुटुंबातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह
अध्यादेशात काय म्हटले आहे ?
- रूम असलेले हॉटेल-लॉज 33 टक्के क्षमतेत सुरू होतील
- संबंधित हॉटेल-लॉज प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असावे
- लॉज आणि हॉटेलचा 33 टक्के भागच वापरावा
- सुरक्षाविषयक सर्व खबरदारी हॉटेल - लॉज चालकाने घ्यावी
- मास्क, ग्लोज सारख्या बाबी हॉटेलने कर्मचारी व ग्राहकांना पुरवाव्यात
- हॉटेलमध्ये डिजिटल पेमेंटचे पर्याय उपलब्ध करावेत
- नियम पाळूनच एसी सुरू करावेत
- स्विमिंग पूल, गेम झोन, चिल्ड्रन प्ले, जिम अशा सुविधा बंद राहतील.
हॉटेलमध्ये जाणाऱ्यांसाठी हे बंधनकारक :
- संबंधिताने 'आरोग्य सेतू' ॲप डाऊनलोड करावे
- हाउसकीपिंगचा कमीत कमी वापर करावा
- कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश
- प्रवास आणि इतर आवश्यक माहिती रिसेप्शनवर पुरवावी
हॉटेल प्रशासनाने ही काळजी घ्यायची :
- रूम खाली झाल्यानंतर 24 तास ती कोणालाही देऊ नये
- लिफ्ट, पाण्याचे ठिकाण आणि स्वच्छतागृहे सतत साफ करावी
- मास्क, ग्लोज आणि इतर नेहमीच्या वापरातील वस्तूची सुरक्षित विल्हेवाट लावावी
लॉज आणि रूम असलेले हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्याचा निर्णय चांगला आहे. मात्र शहरातील इतर हॉटेल देखील सुरू करण्यात परवानगी द्यावी. तीन महिन्याहुन अधिक काळ हे हॉटेल बंद आहेत. त्यावर सुमारे अडीच लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे. या सर्वांचा शासनाने विचार करून इतर हॉटेल सुरू करण्यासही लवकर परवानगी द्यावी -गणेश शेट्टी,अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.