राजगुरुनगर - खेड एसईझेडमधील गोसासी (ता. खेड) येथे हॉटेलमालक नीलेश गोरडे यांच्याकडे गुंडांनी शनिवारी मध्यरात्री खंडणीची मागणी केली. खंडणीस नकार दिल्याने गोरडे यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर बेदम मारहाण केली आणि हॉटेलमध्ये राडा केला. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.