वादात समजावून सांगताना दोघांना मारहाण

वादात समजावून सांगताना दोघांना मारहाण
Published on

वादात समजावून सांगताना दोघांना मारहाण
हॉटेल यारानासमोर ग्राहकाची दुचाकी लावण्यावरून घडलेली घटना, दोघांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ ः हॉटेलसमोर ग्राहकाची दुचाकी लावण्यावरून सुरू असलेल्या वादात समजावून सांगताना दोघांनी दगड व लाथाबुक्क्यांनी तरुणासह मारहाण केली. त्यात त्या दोघांना दुखापत झाली. रविवारी (ता. ६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बाळेमधील शिवाजी नगरातील याराना हॉटेलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी त्या दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सलीम गुलाब शेख, अझरुद्दीन सलीम शेख (रा. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. अरबाज युन्नूस शेख (वय २९, रा. संतोष नगर, बिरोबा मंदिराजवळ, सोलापूर) याने फिर्याद दिली आहे.
याराना हॉटेलसमोर ग्राहकाची दुचाकी लावण्यावरून वाद सुरू होता. तेव्हा अरबाज हा समजावून सांगताना संशयितांनी त्याला शिवीगाळ करत, ‘तुम्हाला खूप मस्ती आली आहे,’ असे म्हटले. ‘तुझ्या खिशातील पैसे दे, नाहीतर तुला सोडणार नाही. तुला मी कोण आहे हे दाखवतो,’ असे म्हणत त्याला खाली पाडून मारहाण केली. अझरुद्दीन याने त्याच्या पँटच्या खिशातील दोन हजारांची रोकड काढून घेतली. या मारहाणीवेळी अरबाज याचे चुलते नवाज गुलाब शेख यांच्यासह तेथील लोक व हॉटेलचे कामगार सोडविण्यास आले. अझरुद्दीन याने, ‘तुम्ही मध्ये पडू नका, मी या भागातील डॉन आहे. माझ्या नादाला लागणाऱ्यांना मी सोडलेले नाही, तुम्हाला जीवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. त्यामुळे तेथे जमलेले लोक दहशतीला घाबरून पळून गेले. या मारहाणीत अरबाज व नवाज यांना दुखापत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com