हडपसर - मांजरी बुद्रुक येथील हॉटेल व्यावसायिक व शेतकरी सतीश सातबा वाघ (वय-५५) यांचे आज सकाळी काही अज्ञातांनी अपहरण केले आहे. श्री. वाघ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले असताना मांजरी फुरसुंगी रस्त्यावर ही घटना घडली. त्यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.