घर आहे, कर नाही!

घर आहे, कर नाही!
Updated on

अनेक मिळकती नोंदणीविना; पालिकेचेही दुर्लक्ष
पुणे - स्वतःचे घर आहे; पण त्यावर करच नाही, अशा अनेक मिळकती शहरात आहेत. या घरांची महापालिकेत नोंदच झाली नसल्याने त्यांच्याकडून करवसुली होत नाही. अशा मिळकतींचा शोधही महापालिका घेत नसल्याने पालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेत घराची नोंद न होण्याचे कारण?
इमारतीचे काम अर्धवट सोडून बांधकाम व्यावसायिक पसार होणे. महापालिकेतून पूर्णत्वाचा दाखला न घेणे. भोगवटापत्र नसणे.

शहरात अशा मिळकती किती?
नेमका आकडा उपलब्ध नाही. मात्र पेठांबरोबरच उपनगरांतही संख्या मोठी.

या मिळकतींचे प्रकार कोणते?
सदनिका, बैठे घर, बंगले इत्यादी. 

नोंदणी नसण्याचे तोटे काय?
महापालिकेला कराच्या रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नाला फटका बसतो. ज्याचे घर आहे, त्याला विकताना किंवा घरावर कर्ज घेताना अडचणी येतात. 

मिळकतकराची आकारणी झालेली नाही, अशा नागरिकांनी पुढे येऊन कर आकारणी करून घेण्याची तयारी दर्शविल्यास महापालिका त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवून आकारणी करून देईल.
- विलास कानडे, करआकारणी - करसंकलन प्रमुख, पुणे महापालिका

नोंदणी करणे फायद्याचे, की तोट्याचे?
- निश्‍चितच फायद्याचे. त्यामुळे आपल्या मिळकतीवर कायदेशीर आपला हक्क राहतो.

महापालिकेने काय पाऊल उचलले आहे?
अशा मिळकतींचा शोध घेऊन त्यांच्याकडून करआकारणी सुरू करायला हवी. मात्र महापालिका त्यांचा शोध घेत नसल्याने कोट्यवधींचे उत्पन्न बुडत आहे.  

मिळकतधारकांचा नोंदणीस नकार कशामुळे?
नोंदणी करून करआकारणीस अनेक जण तयार आहेत. मात्र दंडाची रक्‍कम मोठी असल्याने ते पुढे येत नाहीत.  

त्यांची अपेक्षा काय आहे?
महापालिकेने अभय योजना राबवावी. त्या अंतर्गत या मिळकतींना जुजबी दंड आकारून त्यांची नोंद करून घ्यावी.

या मिळकतींत दुकानांचा समावेश आहे काय?
होय. सदनिका, घरांबरोबरच दुकानांचा व शोरूमचाही समावेश आहे. विशेषतः शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या तसेच सेवा रस्त्याच्या कडेला ही दुकाने आहेत. 

अशा अनेक इमारती शहर आणि उपनगरांमध्ये आहेत. वर्षानुवर्षे नागरिक त्यामध्ये राहत आहेत; परंतु मिळकत कराची आकारणी झालेली नाही. आकारणी करून घेण्यासाठी ते पुढे येण्यास तयार आहेत. महापालिकेने त्यांच्यासाठी स्वतंत्र अभय योजना लागू करून दिलासा द्यावा. 
- सुधीर कुलकर्णी, नागरी हक्क संस्था

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com