home fire
गुनाट - वाढदिवसाला बोलावले नाही, या रागातून निमोणे (ता. शिरूर) येथील ज्ञानदेव चंदर काळे या शेतकऱ्याचे घर माथेफिरू तरुणाने पेटवून दिले. या आगीत काळे यांचे घर पूर्णतः बेचिराख झाले असून, रोख पैसे, दागिने, कपडे, असे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. आगीत संपूर्ण घरच नष्ट झाल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.