

पुणे, ता. ८ : हाऊसकिपिंग सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन व्यावसायिक सेवा व स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ११, १२ व १३ सप्टेंबरला हाऊसकिपिंग व्यवसाय प्रशिक्षण आयोजिले आहे. यामध्ये हाऊसकिपिंग क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, प्रत्यक्ष कामाचे तंत्र आणि व्यवसाय उभारणीसाठी कौशल्यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. हाऊसकिपिंग क्षेत्राची ओळख, साधने व उपकरणांसोबतच सॉफ्ट स्किल्स आणि ग्राहक संवादावर भर देण्यात येणार आहे. तसेच हाऊसकिपिंग व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, निविदा प्रक्रिया, कोटेशन व प्रस्ताव तयार करण्याची पद्धत, मार्केटिंग व ग्राहक मिळविण्याचे मार्ग समजावून सांगितले जातील. गुणवत्ता नियंत्रण, ग्राहक टिकवून ठेवण्याची तंत्रे आणि व्यवसाय वाढ व कमाईचा आराखडा यावरही मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांची मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीन दिवसीय कार्यशाळा ११, १२ व १३ सप्टेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी व किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासाहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
अॅमेझॉनवर उत्पादनाची विक्री
अॅमेझॉनच्या माध्यमातून स्वतःची उत्पादने देशभरात तसेच जागतिक बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व कौशल्यांबाबत मार्गदर्शन करणारी विशेष ऑनलाइन कार्यशाळा १२ व १३ सप्टेंबरला आयोजित केली आहे. उद्योजक, उत्पादक आणि ई-कॉमर्स व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. यात अॅमेझॉन सेलर म्हणून नोंदणी, कागदपत्रे, सुरुवातीचा खर्च, उत्पादन लिस्टिंग, डिलिव्हरी व रिटर्न्स प्रक्रिया तसेच आकर्षक टायटल, तपशील आणि छायाचित्रे तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय ऑफर्स, स्पॉन्सर्ड प्रॉडक्ट्स व ऑनलाइन जाहिरातींचा प्रभावी वापर, पेमेंटचा मागोवा, ग्राहकांच्या समस्या हाताळणे आणि सेलर पोर्टलच्या वापराविषयी माहिती दिली जाणार आहे. प्रात्यक्षिकांसह व्यावसायिक धोरणे व विक्री वाढवण्याच्या व्यावहारिक टिप्स दिल्या जाणार असल्याने स्वतःची उत्पादने ऑनलाइन बाजारपेठेत नेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.