

पुणे, ता. २० : हाऊसकिपिंग सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन व्यावसायिक सेवा व स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी २९ व ३० ऑगस्टला हाऊसकिपिंग व्यवसाय प्रशिक्षण आयोजिले आहे. यामध्ये हाऊसकिपिंग क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, प्रत्यक्ष कामाचे तंत्र आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कौशल्यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. हाऊसकिपिंग क्षेत्राची ओळख, साधने व उपकरणांसोबतच सॉफ्ट स्किल्स, ग्राहक संवादावरही भर देणार आहे. तसेच हाऊसकिपिंग व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, निविदा, कोटेशन व प्रस्तावाची पद्धत, मार्केटिंग व ग्राहक मिळविण्याचे मार्ग समजावून सांगितले जातील. गुणवत्ता नियंत्रण, ग्राहक टिकवून ठेवण्याची तंत्रे आणि व्यवसाय वाढ व कमाईचा आराखडा यावरही मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
प्रॉपर्टी व्हॅल्युएशन फॉर रिअल इस्टेट
बँक कर्जे, प्रकल्प वित्तपुरवठा, विमा, न्यायालयीन प्रकरणे, आयकर तसेच मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी अचूक मालमत्ता मूल्यांकनाची गरज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थावर संपदा मालमत्ता मूल्यांकन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ३१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान विशेष प्रशिक्षण आयोजित केले आहे. यात जमीन व इमारतींचे मूल्यांकन, बाजारमूल्य निश्चितीच्या पद्धती, रेडी रेकनरचा वापर, घसारा, बांधकाम खर्चाचे विश्लेषण, प्रत्यक्ष मालमत्ता पाहणी, मूल्यांकन अहवाल तयार करणे तसेच बँका व वित्तीय संस्थांच्या निकषांविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षण दोन आठवड्यांचे ऑनलाइन आणि एक दिवसाचे प्रात्यक्षिक अशा स्वरूपात होईल.
संपर्क : ८४८४८२२८५५
आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
जागतिकीकरणामुळे भारतीय उत्पादने जगभरातील बाजारपेठेत पोहोचविण्याच्या संधी वाढल्या असून, योग्य नियोजन आणि व्यावसायिक धोरणांच्या आधारे आयात-निर्यात व्यवसाय सुरू करता येतो. या पार्श्वभूमीवर सात दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे. यात एक्झिम धोरण, नोंदणी व परवाने, इन्कोटर्म्स, शिपिंग व कंटेनर व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, दररचना, पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच परदेशी ग्राहक व पुरवठादार शोधणे, बाजारपेठेचा अभ्यास, उत्पादनाची निवड, आंतरराष्ट्रीय वाटाघाटी, व्यवहारातील जोखीम व्यवस्थापन, कागदपत्रे, पेमेंट पद्धती, बँकिंग, कस्टम्स व शिपिंग प्रक्रियेची माहिती दिली जाईल. प्रत्यक्ष उदाहरणे व केस स्टडीजच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना व्यवसायाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाणार असून स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी, उत्पादक आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.